Friday

Dr. Siddharth Dhende: Development Analyisis


नागपूरचाळ-महाराष्ट्र हौसिंग बोर्ड या वॉर्डाचे विद्यमान नगरसेवक आहेत. डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांना आपुलकीने आण्णा असेही म्हटले जाते.
डॉ. धेंडे नगरसेवक झाल्यानंतर केलेली विकासकामे;
१. नागपूरचाळ झोपडपट्टी एस. आर. ए. मुक्त करून केंद्र सरकार, राज्य सरकार व पुणे मनपाच्या संयुक्त माध्यमातून बी. एस यु. पी. अंतर्गत ५०० घरे बांधली आहेत. त्यामुळे नागपूरचाळ झोपडपट्टी विघोषित करण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारपुढे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
२. एयरपोर्ट रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणारी नागपूरचाळ्ची जवळ जवळ १०० घरे व दुकाने यांना अतिक्रमणातून मुक्त करून त्यांना हक्काचा निवारा व व्यवसायाचे केंद्र सुरक्षित करून दिले.
३. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड मधील म्हाडाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्बांधणीचा २.५ चटई निर्देशांक (FSI ) चा प्रश्न नागरिकांना व संयुक्त महासंघ तसेच गाळेधारक महासंघ यांना सोबत घेऊन मा. खा. रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक आमदार, म्हाडाचे प्रतिनिधी, स्थानिक खासदार, पुण्याचे पालकमंत्री यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा करून व मा. मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले  व ते मंजूर करून घेतले.
४. गेल्या १५ वर्षांपासून एम. ई.एस. कॉलनी व नागपूरचाळ सीमेचा मुद्दा कायमस्वरूपी सोडवून सीमाभिंत बांधली.
५. वॉर्डातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याकरिता खालील उपाययोजना केलेल्या आहेत.
अ). वॉर्डातील सर्व जुन्या सिमेंटच्या लाईन बदलून लोखंडी लाईन टाकण्यात आल्या आहेत.
ब). पाण्याची टाकी भरण्याकरिता पंपिंगकरिता पंपिंगमध्ये अखंड वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी टाकण्यात आली.
क). भविष्यात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन जादा पाण्याचा वापर पाहता अजून एक पाण्याची टाकी मा. कर्णे गुरुजी यांच्या सहकार्याने बांधण्यात आली.
ड). पाणीपुरवठासाठी पर्यायी योजना म्हणून वॉर्डात तीन ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आल्या.
६. वॉर्डातील नागरिकांना व विद्यार्थ्यांची सोय होण्याकरिता शहरातील विविध ठिकाणी जाण्याकरिता बसमार्ग सुरु करून व त्याकरिता बस कंट्रोलर केबिन बांधण्यात आली.
७. वॉर्डामध्ये सर्व ठिकाणी विद्युत केबल भूमिगत टाकण्यात आल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले.
८. म.हौ.बोर्ड मधील सर्व सोसायट्यांच्या जुन्या ड्रेनेज लाईन बदलून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्या व सिमेंट कोंक्रीट केले.
९. वॉर्डामधील भेडसाविणाऱ्या ओल्या कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याकरिता बायोग्यास प्लांट सुरु करण्यात आला.
१०. मातृभूमी प्रतिष्ठान येथील वास्तू तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण अवस्थेत पडून होती. ती वास्तू मनपातर्फे पूर्ण करून वॉर्डातील नागरिकांकरिता कम्युनिटी हॉल खुला करण्यात आला.
११. वॉर्डातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील फुटपाथ नव्याने बांधून रस्त्यांच्या कडेने  बसण्याकरिता बेंच बसविण्यात आले.
१२. १०-१२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला, विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन केले, वॉर्डातील गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
१३. निवडून आल्यानंतर वॉर्डात १८० महिला बचत गट स्थापन करून नागरवस्ती विभाग, पुणे मनपा व राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी उद्योग व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक साहाय्य केले.
१४. पुणे मनपाच्या माध्यमातून वॉर्डातील गरजू नागरिकांचा आरोग्य विमा उतरविला.
१५. वॉर्डामधील लुंबिनी उद्यानाचा भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित ‘थीम पार्क’ करून पर्यटनस्थळ म्हणून विकास केला. त्यामुळे वॉर्डाचे व लुंबिनी उद्यानाचे नाव जागतिक नकाशावर आले व लवकर पुणे दर्शन सहलअंतर्गत लुंबिनी उद्यानाचा समावेश होईल.
१६. पुणे मनपाच्या सभागृहात बजेटवर चर्चेमध्ये हिरीरीने सहभागी होऊन गोरगरीब जनतेच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यास प्रशासनास भाग पाडले. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते आदी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करून सभागृहात चर्चा केली.
१७. येरवडा कारागृह वसाहतीतील भाऊसाहेब जाधव मनपा शाळेत उर्दू व इंग्रजी माध्यमांची शाळा चालू करण्याचा ठराव दिला.
१८. वॉर्डामधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात १० लाख खर्च करून क्यारम, चेस, संगणक, प्रिंटर, एल. सी. डी. टी.व्ही. इत्यादी गोष्टींची पूर्तता केली.
१९. वॉर्डात दोन ठिकाणी महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली.
२०. महागाई, पेट्रोल, वीजदरवाढ अशा समाजाशी निगडीत विषयांवर शहर पातळीवर रास्ता रोको, भिक मांगो, निषेध आदी आंदोलने केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यावृत्तीकारिता आंदोलन केले.
२१. पुणे मनपाच्या घोले रोड येथील आंबेडकर होस्टेलची इमारत वाढविण्यासाठी प्रयत्न केले. या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता अजून एक मोठी इमारत व्हावी याकरिता पाठपुरावा करून काम चालू केले.
२२. पुणे शहरातील शहरी गरिबांकरिता आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे मनपाच्या माध्यमातून २ लाखांचा आरोग्य विमा आणण्यासाठी पाठपुरावा करून योजना कार्यान्वित केली.
२३. पुणे मनपा करसंकलन विभागात पाठपुरावा करून तिप्पट कर आकारणी रद्द करणेकरिता प्रयत्न करीत आहे.
२४. राज्यात खासगी विद्यापीठांना मंजुरी देऊ नये अथवा खासगी विद्यापीठांमध्ये आरक्षणाची तरतूद असावी याकरिता आरक्षण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून माननीय राज्यपाल व मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विरोध दर्शविला.
२५. ससूनमध्ये क्षय रुग्णांसाठी खाता आरक्षित करण्यासाठी आंदोलन करून हा प्रश्न मार्गी लावला.
२६. वाघोलीतील दगडखाण कामगारांना पाणीपुरवठा करण्याचा प्रश्न मार्गी लावला.
२७. पुणे मनपाच्या शिक्षण मंडळाच्या गलथान कारभाराविरोधात शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेश परिधान करून सभागृहात तीव्र आंदोलन केले.
२८. सामाजिक बांधिलकी जोपासून वॉर्डातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न केला.
२९. वॉर्डातील चर्च, गणपती मंदिरे, महादेवाची मंदिरे, दुर्गामातेचे मंदिर, साईबाबा मंदिर व बौद्ध विहाराच्या बांधकामामध्ये यथोचित योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
३०. एयरपोर्ट रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बाधित होत असलेले साईबाबा मंदिर स्थलांतरीत करून पूर्णपणे नव्याने बांधून घेतले.

No comments:

Post a Comment