Thursday

Dr. Siddharth Dhende :घोषित होणारी देशातील पहिली झोपडपट्टी

News Dated: 06 Sep 2011


वॉर्ड क्रमांक १५ - नागपूर चाळ
काही वर्षांपूर्वी झोपडपट्टी असलेल्या नागपूर चाळीचा आता चेहरामोहरा बदलत आहे. घोषित झोपडपट्टीपासून अघोषित झोपडपट्टीपर्यंतचा प्रवास उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या नागरिकांना या विकासाने संमोहित केले आहे. विकासाची कास धरलेल्या या नागरिकांच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत. अनियमित आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी केलेले "पॅचिंग', त्यातून रस्त्यावर तयार झालेले उंचवटे नागरिकांना विकासाच्या वाटेतील अडथळे वाटत आहेत.नागपूर चाळ शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर गलिच्छ, गजबजलेल्या आणि बजबजपुरी असलेल्या झोपडपट्टीचे चित्र उभे राहात होते. या झोपडपट्टीलाच लागून असलेला हाउसिंग बोर्ड हा वॉर्डातील दुसरा भाग. यातील घरेही ओबडधोबड आणि धोकादायक झालेली. कोणत्याही क्षणी कोसळतील, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अशा आव्हानात्मक स्थितीत नागपूर चाळीच्या विकासाचा गाडा रुतलेला आहे. त्यापैकी झोपडपट्टीचे निर्मूलन करून तेथे आता पक्की घरे उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. "बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुवर' (बीएसयूपी) या केंद्र सरकारच्या प्रकल्पांतर्गत तेथील झोपडपट्ट्यांच्या जागी घरे बांधण्यात येत आहेत. त्यातून विकासाच्या गाड्याचे रुतलेले एक चाक बाहेर येत असल्याचे दिसते.


Source: http://www.esakal.com/esakal/20110906/5383414269069536039.htm

No comments:

Post a Comment